आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक परिषदेच्या मागणीस यश:नऊ केंद्रप्रमुख; दोन मुख्याध्यापकांना पदोन्नती

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी पदाची पदोन्नतीने भरावयाची ११ पदे रिक्त होती. तब्बल १०-१२ वर्षानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईआे) रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली असून जिल्ह्यातील शिक्षण विभागातील नऊ केंद्रप्रमुख व दोन पदोन्नती मुख्याध्यापकांना शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नतीचे आदेश जिल्हा प्रशासनाने नुकतेच निर्गमित केले.

जिल्ह्यात शिक्षण विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख या पर्यवेक्षीय यंत्रणेची अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम गुणवत्तेवर होताना दिसत होता. यासाठी शिक्षक परिषदेतर्फे निवेदने देऊन पदोन्नती प्रक्रिया लवकर राबवण्याबाबत सातत्याने आग्रही भूमिका मांडली. पदोन्नतीस विलंब होत असल्याने प्रसंगी ढोल बजाव आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पाठपुराव्यासह प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सीईआे गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पदोन्नती प्रक्रिया यशस्वीपणे राबववण्यात आली. त्याबद्दल जिल्ह्यातील पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पदोन्नती प्रक्रियेबाबत अधिकारी राजेंद्र पाटील, सतीश चौधरी, भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण, सुभाष मारणर, परेश वळवी यांचे सहकार्य लाभले. शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, रामकृष्ण बागल, राकेश आव्हाडांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...