आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस; राहुल गांधींच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस देण्यात आली . त्यानुसार दिल्ली येथे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात १३ जून २०२२ रोजी चौकशीसाठी ते उपस्थित राहिलेत. मात्र त्यांची चौकशी सतत तीन दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलावणे यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलिसांकडून घेराव घालणे, पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना अकारण पोलिसांकडून मारहाण होणे व त्यांना डांबून ठेवणे असे प्रकार घडले आहेत. या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले.

पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली. या वेळी माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जि.प. सभापती अजित नाईक, निर्मला राऊत, जि.प. सदस्य सुहास नाईक, जि.प. गटनेता सी. के. पाडवी, सुरेश इंद्रजित, एजाज बागवान, सदस्य सुभाष पाटील, देवाजी चौधरी, सीताराम राऊत, डी. व्ही. राजपूत व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...