आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार जिल्हा हा दुर्गम भूप्रदेशाचा जिल्हा असल्यामुळे रस्ते, सोयी-सुविधांचा अभाव या जिल्हावासीयांच्या जणू पाचवीलाच पुजलेला. रस्ते बनूच शकत नाही असा डोंगरी प्रदेश असल्यामुळे तिथे शहरासारखी रुग्णवाहिका धावण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सर्पदंशापासून वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू अगदीच स्वस्त झालेला. काठीला झोळी बांधून रुग्णांना नेतानाचे फोटो आतापर्यंत वारंवार प्रसिद्ध झाले आहेत. पण हे चित्र बदलायचे हा निर्धार केलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी छत्तीसगडमध्ये पाहिलेली तीन चाकांची बाइक ॲम्ब्युलन्स जिल्ह्यात आणण्याचा निर्णय घेतला आणि जून २०२१ पासून इथे ही ॲम्ब्युलन्स रुग्णांना घेऊन पळू लागली आहे.
अशी आहे बाइक ॲम्ब्युलन्स
ही बाईक ॲम्ब्युलन्स म्हणजे दुचाकीला ‘साइड कार’ सारखी एक गाडी बसवण्यात आली आहे. त्यात एक रुग्ण झोपू शकतो. ऑक्सिजनची व्यवस्था आणि रुग्णावर प्राथमिक उपचार करता येतील एवढी अौषधी त्यात असते. रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी कारच्या मध्यभागी डबल सस्पेंशन लावले आहेत, त्यामुळे रस्ता कितीही खराब असला तरी दणके बसत नाही.
रुग्णावर असे केले जातात उपचार
नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण १० बाइक अॅम्ब्युलन्स आहेत. त्यातील पाच धडगाव तर पाच अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ठेवल्या आहेत. बाइक अॅम्ब्युलन्सच्या मदतीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. त्यावर रुग्ण वा त्यांच्या नातलगांनी संपर्क साधताच ही अॅम्ब्युलन्स तिथे पोहोचते. ३० किलोमीटरच्या परिसरात ही सेवा पुरवली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.