आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेळेवर लग्न लावणे, लग्नात मागणी करणे, मानपान प्रथा, आहेर वाटप बंद करण्याचा निर्णय १६ जून २०२२ रोजी झालेल्या तिमाही मासिक बैठकीत नंदुरबार नाभिक हितवर्धक व कर्मचारी संस्थेमार्फत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी नवापूर नाभिक समाजाने सुरू करण्यात सुरुवात केली आहे.
नवापूर नाभिक समाज हितवर्धक संस्थेचे संचालक अशोक सैंदाणे यांच्या मुलागा रोनितच्या लग्न कार्यापासून सुरुवात करून नवा आदर्श निर्माण करत आहेत. रोनितच्या लग्नाच्या पत्रिका या व्हाॅट्सअॅपवरूनच सर्व पालकांना, नातेवाइकांना, समाजबांधवांना, मित्रपरिवाराला पाठवण्यात येणार आहेत. पारावर नवरदेवासाठी फक्त मिठाई घेऊन जाणे, लग्नात मानपान प्रथा बंद, आहेर वाटप बंद, वेळेवर लग्न लावण्यासाठी प्रयत्नशील असणे. पारावर नवरदेवाचा व सुक्याचे रुसणं किंवा ऐनवेळी चेन, अंगठी सारख्या मोठ्या वस्तूची मागणी करणे बंद करण्यात येणार आहे. समाजाचा होणारा नाहक खर्च कमी करण्यासाठी समाज प्रबोधनात्मक समाज हितार्थ अशा उपक्रमाची सुरुवात केली. या वेळी उपस्थित नवापूर नाभिक समाजाचे ज्येष्ठ प्रकाश सैंदाणे, सोमनाथ महाले, दिलीप पवार, रघुनाथ मोरे, संदीप सोनवणे, संजय सोनवणे, संदीप हिरे, रवी सोनवणे, आबा मोरे, मनोज बोरसे, हरीश सोनवणे, जीवन साळी, सिद्धू भदाणे उपस्थित होते.
शुभ कार्यातील विघ्न टळेल : लग्नकार्यप्रसंगी लग्नपत्रिका बाहेरगावी जाऊन घरोघरी नातलगांना, समाज बांधवांना आमंत्रण देण्यासाठी जाताना अपघाताची भीती असते. कधी नवरी, नवरदेव यांचे वडील, भाऊ, काका, मामा यांचा अपघात होताे. दुर्दैवाने जीव गमवावा लागतो. शुभ कार्यात दुःखाचा प्रसंग ओढवतो. तसेच आर्थिक खर्च होतो. त्यासाठी समाज माध्यमातून आमंत्रण स्वीकारावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.