आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात धाव:कंपनीचे कार्यालय वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांची न्यायालयात धाव; दुसऱ्या दिवशी सुरू झाले काम

नंदुरबार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाने वीज महावितरण कंपनीच्या जमिनीचा ताबा जमीन मालकाने घेतल्यानंतर मंगळवारी रात्री अकरा वाजता कंपनीच्या १५० कर्मचाऱ्यांनी कार्यालय वाचवण्यासाठी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तसेच या प्रकरणी न्यायालयात अपील दाखल करून कंपनीने जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, न्यायालयात अपील केल्याने दुसऱ्या दिवशी चार टेबलांवर पुन्हा कंपनीच्या आठ कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. त्यामुळे वीज बिल भरण्यापोटी दुपारी २ वाजेपर्यंत रोख ४ लाख १४ हजार तर धनादेशाद्वारे १ लाख ५० हजारांची वसुली करण्यात आली.

१९३७ पासून महावितरण कंपनीच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा ताबा मदनलाल जैन या उद्योगपतीकडे देण्याचे आदेश मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाने दिल्याने मोठी खळबळ उडाली. न्यायालयाच्या या लढाईत मंगळवारी हार पत्करावी लागल्याची भावना उमटून महावितरणचे कर्मचारी हवालदिल झाले. अनेक कर्मचारी याच कार्यालयात सुरुवातीपासून कामावर आहेत. त्यामुळे या जागेशी त्यांची भावनिक नाळ जुळली आहे. उद्योगपती जैन यांच्या ताब्यात जागा देण्याचे आदेश कनिष्ठ स्तर न्यायालयाने दिल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना धक्का बसला. कार्यालय कंपनीकडेच राहण्यासाठी जोरदार प्रयत्न शहराच्या लोकांशी निगडीत असलेल्या या महावितरण कंपनीच्या कार्यालयात २० कर्मचारी काम करतात. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे, रोखीने व धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम स्विकारणे ही कामे येथे चालतात. पण मंगळवारी अचानक कंपनीचे सामान बाहेर काढण्याच्या कार्यवाहीमुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला. तसेच दुसऱ्या दिवशी चार टेबलवर हे कर्मचारी इमानेइतबारे काम करताना दिसून आले. ही जागा महावितरण कंपनीकडे राहावी, यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापुढे काय होते, याकडेल नंदुरबारकरांचे लक्ष लागले आहे.

अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने ओढवली नामुष्की
हे जागेचे प्रकरण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्याने अचानक सामान काढून देण्याइतपत नामुष्की ओढवली. या सर्व प्रकाराला कनिष्ठ अभियंता मनीषा कोठारी यांनी तोंड दिले. अखेर रात्री उशिराने जळगावहून वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्याने निकालावर न्यायालयात फेर विचार याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे कार्यालयात पुन्हा महावितरण कंपनीचे कर्मचारी काम करताना दिसले.

बातम्या आणखी आहेत...