आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर; पदाधिकारी लागले तयारीला

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी येथे केले.येथील पक्षाच्या “विजयपर्व’ कार्यालयात झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री डॉ.गावीत बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी होते. याप्रसंगी बोलताना डॉ.गावीत म्हणाले की, बावनकुळे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नंदुरबारला येत असल्याने कार्यक्रम गुणात्मक व संख्यात्मक दृष्टिकोनातून चांगला झाला पाहिजे.

यावेळी मंचावर जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, तालुकाध्यक्ष भरत गावीत, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा सचिव संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. या प्रसंगी पक्षाच्या प्रथेप्रमाणे वर्ग गीताने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी यांनी केले तर आभार गावित यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दाैऱ्यानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह दिसून आला.

जिल्हा दाैऱ्यामुळे संघटनात्मक बळकटी : चाैधरी
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चौधरी म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एक प्रभावशाली नेते व वक्तेदेखील आहेत. त्यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे संघटनात्मक बळकटी प्राप्त होणार असून, १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या आगमनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धन समर्पित भावनेने स्वागतासाठी सज्ज व्हावे व कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहनही चौधरी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...