आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कासाठी लढा:किमान वेतनासह सामाजिक सुरक्षेसाठी दीड हजार आशा, गट प्रवर्तक महिला रस्त्यावर; जि.प.च्या गेटसमोर आंदोलन

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागात कार्यरत आशा, गट प्रवर्तकांना राज्य सरकारने किमान वेतन द्यावे, वेतन सुसूत्रीकरणामध्ये आरोग्य विभागात गट प्रवर्तक म्हणून सामावून घ्यावे, सामाजिक सुरक्षा लागू करा, मोफत काम करून घेणे बंद करा यासह विविध मागण्यांसाठी दीड हजारावर आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर साेमवारी आंदोलन केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००५पासून आरोग्य विभागात बालमृत्यू रोखण्यासाठी व आरोग्य सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी आशाची नेमणूक करण्यात आली. मात्र त्यांना कमी मानधन दिले जात आहे, गट प्रवर्तकांना गाव भेटीसाठी फक्त प्रवास भत्ता दिला जातो. महिला कर्मचाऱ्यांकडून विना मोबदला काम करून घेतले जाते, हे अन्यायकारक आहे. गटप्रवर्तक उच्चशिक्षित महिलांचे शोषण केले जात आहे. या विरोधात सातत्याने आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सचिव राजू देसले, वैशाली खंदारे, ईश्वर पााटील, ललिता माळी, रत्ना नंदन, माया घोलप, वसंत पाटील, गुली पावरा आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अंशकालीन स्त्री परिचरांना अल्प मानधन
अंशकालीन स्त्री परिचरला जि.प. सेवेत सामावून घेत कायम करावे. या परिचरांना केंद्र शासन केवळ शंभर रुपये देऊन स्त्री परिचरांचा अपमान करीत आहे. राज्य शासनाकडून केवळ २ हजार ९०० रुपये मानधन दिले जात आहे. या महिला कर्मचारी ३० वर्षांपासून सेवेत आहेत. यासाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटनेनेही निवेदन दिलेे. यावर दिनू गावित, मंगला मराठे, छाया वसावे, व्दारका तडवी, हिरा वळवी, राधा मिस्त्री, चित्रा भिला, मीरा पाटील, विमल गावित यांची नावे आहेत.

आरोग्य विभागात ५० % जागांची भरती करा
गट प्रवर्तकांमधून आरोग्य विभागांत पन्नास टक्के जागांची भरती करावी, गट प्रवर्तकांना पगारी सुट्टी, किरकोळ रजा, बाळंतपणच्या पगारी रजा त्वरित लागू करा, गट प्रवर्तक गाव भेटी वेळी वरिष्ठ अधिकारी सही घेण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व फोटो सक्ती निर्णय रद्द करावा, लोकेशनसह फोटो मागणे रद्द करावे, कपात प्रवास भत्ता द्यावा. गट प्रवर्तकांना कोणताही मोबदला मिळत नाही. आशा सॉफ्टवेअर माहिती भरण्याचा बंद केलेला मोबदला द्यावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...