आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अचानक ब्रेक दाबल्यामुळे एक ठार; दोन जण जखमी

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारचाकी वाहनातील चालकाने लोणखेडा कॉलेजजवळ अचानक ब्रेक मारल्याने नटवर धन्या पावरा हा ठार झाला. या अपघातात दारासिंग पाडक्या पावरा (३४), सायसिंग जामसिंग पावरा हे दोघेही जखमी झाले. पोह अशोक कोळी यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

चालक रोशन सरदार पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत डोक्या पावरा यांनी फिर्याद दिली. १२ जून रोजी ११ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...