आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:फेस दोंदवाडे शिवारात वीज पडून एक ठार; एक जखमी, जखमीवर उपचार सुरू

शहादा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील दोंदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

शहादा तालुक्यातील फेस येथील रहिवासी अर्जुन सोमजी पाटील यांचे शेत दोंदवाडे (ता.शहादा) येथे आहे. हे शेत सायसिंग तडवी (वय २५) हा नफ्याने करीत होता. १८ शनिवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वीज व वाऱ्यासह दमदार पावसाने सुरुवात झाली होती. सायसिंग तेजका तडवी व पत्नी ईमा सायसिंग व सासू रतनी गोमता पाडवी व शेतमजूर ईश्वर नथ्थू चौधरी राहणार फेस हे शेतात काम करीत असल्याने पावसाच्या व वीज कडकडण्याचा अंदाज बघून शेतातील झोपडीत थांबलेले होते. तेवढ्यात मोठ्या विजेचा आवाज झाला. या वेळी सायसिंग तेजका तळवी (वय २५) यांच्यावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. तर शेतमजूर ईश्वर नथू चौधरी (रा. फेस ता.शहादा) हा गंभीर जखमी झाला आहे. वडाळी बीटचे मंडळ अधिकारी विजय सावळे, तलाठी महेश ठाकरे वडाळी, नीलेश मोरे बामखेडा यांनी पंचनामा केला. तसेच सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक भगवान कोळी यांनी ही घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...