आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:व्हिस्कीच्या एक लाख बाटल्या केल्या जप्त; 1 कोटी 14 लाख 68 हजार रूपये किमतीचे मद्य पोलिसांच्या हाती

नंदुरबार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्य राज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला असून कंटेनरसह सुमारे १ कोटी १४ लाख ६८ हजार रूपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले.

दोंडाईचा ते न्याहली गावाजवळ पॅक बॉडी असलेला कंटेनर (एमएच ४६, एफ ४८६८) या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामुध्ये व्हिस्कीच्या १ लाख ३ हजार ६८० बाटल्या आढळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक डी. एम. चकोर, पी. जे. मेहता, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, पी. एस. पाटील, भुषण एम चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम एम पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे आदींनी ही कामगिरी केली. संशयित आरोपी रोहित जालिंदर खंदारे (रा.पोखरापुरा, ता मोहोळ, जि.सोलापूर), अविनाश मोहन दळवे (रा.पोखरापूर ता.मोहळ) यांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...