आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅकअप तोडून पळालेल्या दोघांना अटक:दरोड्याच्या तयारीत असताना पकडले पण 8 तासांतच पळाले होते 5 संशयीत, 3 अद्याप पसारच

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअपची खिडकी तोडून पाच आरोपी पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पसार झाले. त्यातील एक आरोपीला गुजरात पोलिसांनी पकडले तर आज नंदुरबार पोलिसांना एक आरोपी पकडण्यात यश आले आहे. पाचपैकी तीन संशयित अद्याप पसार आहेत.

काय आहे प्रकरण?

नवापूर येथे रविवारी मध्यरात्रीनंतर (रात्री 1.25 वाजता) दरोड्याच्या प्रयत्नात संशयितांना पोलिसांनी पकडले होते. पंरतु सोमवारी सकाळी नऊ वाजता पाच संशयित लाॅकअपची खिडकी तोडून पसार झाले होते. यानंतर संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात सहा पथके रवाना केली होती.

मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकापाणी गावाचा जंगलात अकीलखाॅ ईस्माईलखाॅ पठाण (वय 22, रा. भोकरदन, जि. जालना) हा आरोपीला नंदुरबार पोलिसांना मिळून आल्याने त्याला पकडण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. पाच पैकी उर्वरित तीन आरोपी देखील लवकर जेरबंद करण्यात येतील अशी माहिती पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे.

पकडलेले आरोपींची नावे

  • हैदर ऊर्फ इस्राईल ईस्माईल पठाण (वय 20 वर्षे, रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याला माणिकपूर जवळ गुजरात पोलिसांनी पाच डिसेंबर रोजी पकडले.
  • अकिलखों ईस्माईलखॉ पठाण (वय 22 वर्षे, रा. कठोरा बजार, ता. भोकरदन, जि. जालना) या संशयिताला आठ डिसेंबर रोजी नंदुरबार एलसीबीने मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील खडकपाणी गावाचा जंगलात पकडले.

हे आहेत अद्याप पसार

  • इरफान ईब्राहीम पठाण (वय 35 वर्षे, रा. ब्राम्हनी - गराडा, ता. कन्नड)
  • युसुफ असिफ पठाण (वय 22 वर्षे, रा. ब्राम्हनी गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
  • गौसखों हानिफखॉ पठाण (वय 34 वर्षे, रा. ब्राम्हनी- गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...