आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शिक्षण:नंदूरबार जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांची तारेवरची कसरत, झाडावर चढून करावा लागतोय अभ्यास; गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचण

नंदूरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामस्थ म्हणतात - ऑनलाईन क्लासेसच्या मजबूरीत मुलांना झाडावर चढून अभ्यास करावा लागतो

कोरोना संक्रमणामुळे राज्यातील शाळा मागील 5 महिन्यांपासून बंद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळा ऑनलाईन सुरू करण्यास सांगितले होते. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असेच काहीसे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून आले आहे. शिक्षणासाठी लहान मुलांना झाडावर बसावे लागत आहे.

नेटवर्क प्रॉब्लेम्समुळे मुलांना जीव टांगणीवर लावावा लागत आहे

जिल्ह्यातील धाडगावातील मुलांचे म्हणणे आहे की, गावात नेटवर्कची अडचण असल्यामुळे त्यांना झाडावर बसावे लागत आहे. गावातले लोक म्हणतात की, ऑनलाईन क्लासेसच्या मजबूरीत मुलांना झाडावर चढून अभ्यास करावा लागत आहे. विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर मोबाइलमध्ये नेटवर्क येते आणि मुले योग्य व्हिडिओ पाहू शकतात.

गावातील मुले रोज अभ्यासासाठी टेकडीवरील झाडावर जातात
गावातील मुले रोज अभ्यासासाठी टेकडीवरील झाडावर जातात

परिसरात मोबाइल टॉवरचा अभाव

नाशिक शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रवीण पाटील यांचे म्हणणे आहे की, या भागात फक्त काही मोजके मोबाइल टॉवर आहेत, ज्यामुळे सेल्युलर कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट गतीची समस्या आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...