आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरचक:धरणात 38 टक्केच साठा; 2 महिन्यांनी पाणीकपातीचे संकट

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जलजागृती सप्ताह कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकरांची माहिती

नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळ अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. ज्या विरचक धरणातून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्या धरणात केवळ ३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने दोन महिन्यांनंतर पाणी कपातीशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने मध्यम प्रकल्प पथकाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी केले.

पंचायत समिती सभागृहात जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खैरनार, उप कार्यकारी अभियंता मीनल वाघ, सुमास गावित, गट विकास अधिकारी महेश वळवी, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे प्रा. एन. एम. भामरे आदी उपस्थित होते. चिनावलकर म्हणाले, पाणीटंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जनतेचे सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी पाणी वापराचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळला तरच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता वापर केला पाहिजे. १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबवण्यात येत असून विविध विभागानी आपल्या स्तरावर गावागावात पाणी बचतीचे महत्त्व, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके या विषयी मार्गदर्शन करून जनजागृती करावी.

खैरनार म्हणाले की, दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे भामरे यांनी पाणी बचत बाबत महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन शाखा अभियंता विजय जाधव यांनी केले. उपकार्यकारी अभियंता वाघ यांनी आभार मानले.

शहरातून काढली जलदिंडी प्रारंभी जलसप्ताहाच्या निमित्ताने जलदिंडीत जिल्ह्यातून वाहणाऱ्या नर्मदा, तापी, शिवण, उदई, नागण, नेसू, रंगावली, देहली, गोमाई या ९ नद्यांचे पाणी जलकलशात घेऊन जलदिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातून वाहणाऱ्या विविध नद्यातील पाण्याचे पाणी जलकलशात टाकून जलकलशाचे पूजन तसेच जल प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन खत्री यांनी केले. जलसंवर्धनाची शपथ घेताना जिल्हाधिकारी मनीषा खत्री. समवेत मान्यवर.

बातम्या आणखी आहेत...