आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंकट गडद:विरचक धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा; शहरातील पाणी कपात होणार

नंदुरबार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धरणात केवळ वीस टक्केच जलसाठा असल्याने तो महिनाभरच पुरेल ऐवढा आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर प्रसंगी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे हा एकमेव पर्याय पालिकेसमोर आहे.

यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता. जून महिन्यात पावसाचे आगमन उशिरानेच झाले. रविवारी जेमतेम ३७ तर सोमवारी १२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गत सोमवारी तास भर पडलेल्या पावसाने अनेक घरात पाणी शिरून नुकसान झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असे चिन्ह होते. परंतु आठवडा उलटूनही पाऊस न पडल्याने ओढ दिली. त्यात अद्याप कोणताही पुरेसा जलसाठा वाढलेला नाही. दरम्यान, खरीप ज्वारी, तूर, मुग, उडीद, पपई, ऊस या पिकांच्या संदर्भात हवामान खात्याने कृषी सल्ला जारी केला आहे. तसेच पावसाळयापूर्वी जनावरांना रोगप्रतिबंध लसी टोचून घ्याव्यात, गोठा दुरूस्त करावा. छताची छिद्रे बंद करावीत. गोठयाभोवती पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

शंभर टक्के भार विचरक धरणावर
नंदुरबारला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ २० टक्केच साठा शिल्लक आहे. हा साठा जेमतेम १ महिना पुरणार आहे. आष्टयाहून २० तर विरचकवरून ८० टक्के पाणी पुरवठा केला जातो. आष्टा येथील धरण कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे शंभर टक्के पाणी पुरवठा विरचक धरणातून केला जात आहे.

हलक्या पावसाची शक्यता
पुढील ४ दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कोळदा विज्ञान केंद्राच्यावतीने वर्तवण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांत अनेकदा ढगाळ वातारण, उकाळा असे पावसाळी वातावरण तयार होत असले तरी थंेबभरही पाऊस पडलेला नाही.

कृषी केंद्राचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची पेरणी केली जाते. कापूस पेरणीला प्रारंभही झाला आहे. परंतु पुरेसा पाऊस पडत नाही तो पर्यंत कुणीही पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सद्या कमला ३४ ते ३६ तापमान आहे. पावसाचे वातावरण निर्माण होते. मात्र पाऊस पडत नसल्याने आता सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार
नंदुरबार शहराला विरचक धरणातून पाणी पुरविण्यात येते. या धरणात आता जलसाठा कमी राहिला आहे. सद्या नंदुरबार शहराला एक दिवसाआड पाणी दिले जाते. दमदार पाऊस पडला नाही तर दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा फेर विचार करावा लागेल.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...