आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:क्रीडा शिबिरांतून नवोदित खेळाडूंना संधी; क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांचे प्रतिपादन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांतून नवोदित खेळाडूंची मैदानाकडे ओढ वाढत आहे. यातून बाल खेळाडूंचे मैदानाशी नाते जोडले जाणार आहे, असे प्रतिपादन क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांनी केले. ते येथील उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन व आबाजी स्पोर्ट‌्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर झाले. या वेळी उद्घाटन क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, जिल्हा टेनिक्वॉइट संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक, उपाध्यक्ष श्रीराम मोडक, कराटे प्रशिक्षक दिनेश बैसाणे, खो-खो प्रशिक्षक अनिल रौंदळ, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या एन.आय.एस. प्रशिक्षिका सुवर्णा राठोड, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे सचिव जगदीश वंजारी, क्रीडा कार्यकर्ते प्रा.डॉ.मयूर ठाकरे, फ्लोअर बॉल संघटनेचे सचिव जितेंद्र माळी, सहसचिव भरत चौधरी आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाल्या की, बालवयात मोबाइल, इंटरनेटशी मैत्री न करता मैदानाशी नाते जोडणे गरजेचे आहे.

पालकांनीही मुलांच्या या मैदानावरील सातत्यासाठी सतत लक्ष द्यायला हवे. शिबिर यशस्वितेसाठी आनंदा मराठे, गोपाल चव्हाण, राकेश चौधरी, मनिष सनेर, नकुल चौधरी, योगेश माळी, राजेश्वर चौधरी, प्रदीप माळी, तेजस्विनी चौधरी, आदी परिश्रम घेत आहेत. बॉक्सिंग, योगा, ऍथलेटिक्स, वुशु, क्रिकेट, किक बॉक्सिंग, टेनिक्वॉइट आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...