आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:महिला जिल्हाध्यक्षपदी सरीता भामरे यांना संधी;शिंपी समाज जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ शिंपी यांची निवड

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे २२ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच चाळीसगावला पार पडले. या अधिवेशनात येथील रहिवासी सुभाष सावळे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ शिंपी यांची तर महिला जिल्हाध्यक्षपदी सरिता भामरे यांची निवड झाली. या निवडीबद्दल नंदुरबार शिंपी समाजातर्फे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष सावळे, नूतन जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिंपी, महिला जिल्हाध्यक्ष सरिता भामरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बलवंत निकुंभ, लोटन बाविस्कर, दत्तात्रय शिंपी, प्रदीप शिंपी, योगेश जाधव, विजय सावळे, मोहन भामरे, योगेश खैरनार, राजेंद्र जगताप, देविदास कापडणे, दिनेश पवार, विवेकानंद चव्हाण, अमित कापडणे, चेतन भामरे, अरुणा बाविस्कर, पूजा शिंपी, कल्पना पवार, वंदना चव्हाण, नैना भामरे आदी उपस्थित होते. यावेळी नूतन राष्ट्रीय उपाध्यक्ष सावळे यांनी सांगितले की, समाजासाठी काम करण्याची मोठी संधी मला उपलब्ध झाली. तळागाळातील बांधवासाठी चांगले उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात मदत तसेच महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करण्याचा मानस आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप शिंपी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...