आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शेतातून ट्रॅक्टर नेण्यासाठी विरोध; शिक्षकास मारहाण

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसाचे ट्रक, ट्रॅक्टर रस्त्याने घेऊन जाण्यास विरोध करून चौघांनी अब्दुल अलिम अब्दुल लतिफ या उपशिक्षकाला मारहाण केली. अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्या पुळी शिवारात २० जुलै रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल लतिफ यांना शेतातील मका, ऊस पिकांना पाणी मारायचे होते. मात्र नाजिमोद्दीन मक्राणी, सईदोद्दीन मक्राणी, वजीरोद्दीन मक्राणी व रफिकोद्दीन मक्राणी या चारही जणांनी ट्रॅक्टर घेऊन जाण्यास नकार दिला. तसेच शिवीगाळ करीत डेंगाऱ्याने मारहाण केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असई मनोहर कोळी यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...