आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रंथदिंडी, कविसंमेलनासह कार्यक्रमांची पर्वणी; पालकमंत्री डॉ.गावितांच्या हस्ते आज हाेणार उद्घाटन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी इंदिरा मंगल कार्यालयात ५ व ६ डिसेंबर रोजी नंदुरबार ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. या दाेन दिवसांच्या उत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वा. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, नंदुरबार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावीत तर अध्यक्षस्थानी खासदार डॉ.हिनाताई गावीत राहणार असून या कार्यक्रमास आमदार सर्वश्री अमरीशभाई पटेल, डॉ.सुधीर तांबे, किशोर दराडे, आमश्या पाडवी, ॲड.के.सी.पाटील, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, दिनानाथ मनोहर याची प्रमुख उपस्थिती राहील.

ग्रंथोत्सवात पहिल्या दिवशी प्रथम सत्रात सकाळी १२.३० ते १.३०वाजता ‘वाचन संस्कृती काल- आज-उद्या’, २१व्या शतकातील वाचन संस्कृती कोरोनानंतरचे वाचन संस्कृती पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान असून अध्यक्षस्थानी प्रभाकर भावसार हे असून प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार असतील.

दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ३.३० वाजता ‘कथा परिसंवाद’ कार्यक्रम हाेईल. अध्यक्षस्थानी डॉ.अलका कुलकर्णी, प्रा.डॉ.आर.ए.पाटील, प्रा.डॉ.माधव कदम यांचा सहभाग असेल. तिसऱ्या सत्रात दुपारी ४ ते ५.३० वाजता स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रंथदिंडीने हाेणार उत्सवाचा प्रारंभ
सोमवारी सकाळी ९वा. ग्रंथदिंडीने होणार आहे. ही ग्रंथदिंडी नेहरु पुतळा- हाटदरवाजा- काकाचा ढाबा मार्गे इंदिरा मंगल कार्यालय या मार्गावरुन काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...