आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यूत वाढ:आपचे राज्य संयोजक डॉ. संतोष करमकर यांचा आरोप

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला हॉस्पिटलची इमारत भव्य आहे. मार्बलच्या भिंती आहेत, मात्र सर्व घाणीचे साम्राज्य आहे. दोन लाखांचे बेड धूळखात पडले आहेत. धानोरा येथील रूरल हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय आहे. डॉक्टर चांगल्या पद्धतीने कामे करीत आहेत, मात्र सुविधांचा अभाव असल्याने नंदुरबार जिल्ह्यात महिला व बाल मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक डॉ. संतोष करमकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ही विस्कळीत आरोग्य यंत्रणा दुरुस्त झाली नाही तर २६ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

येथील एका खासगी हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागीय समन्वय डॉ. शरद बोडके, चंदन पवार, आम आदमी पार्टीचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील, रवी गावित, सावळाम कारे, योगेश पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

करमकर म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील समस्या, त्यावरील उपाय सांगणार तसेच सामान्यांच्या योजना लाेकांपर्यंत जनजागृतीव्दारे पोहाेचवणार आहोत. नंदुरबारचे महिला हॉस्पिटल तर कोविडपूर्वी अस्तित्वात आले. हॉस्पिटलच्या बांधकामावर खूप खर्च झाला आहे. मार्बलच्या रूम आहेत. पण हे हॉस्पिटल भकास आहे. याचा फारसा वापर होत नाही, असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...