आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:नाईक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या व पालकांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य महेंद्र मोरे, उपमुख्याध्यापक जे. एम. पाटील, पर्यवेक्षक अनिल खेडकर, संजय बोरसे उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेले नकुल विजय अहिरे, मयूर महेंद्र पाटील, द्वितीय आलेला रेहान हन्नान खाटीक व तृतीय आलेला प्रभू संजय जाधव यांच्या व त्यांच्या पालकांच्या शैक्षणिक साहित्य व स्नेहवस्र देऊन सन्मान केला. या वेळी बोलताना संजय राजपूत यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कायमस्वरूपी टिकवावे. परिश्रमातून उच्च शिक्षण घेऊन संस्थेचे व शाळेचे नावलौकिक करावे. शिक्षकांनी शाळेचे यश टिकवण्यासाठी चांगले अध्यापन करावे, असे आवाहन केले. या बैठकीत पालकांनीदेखील मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्ही.एस. पावरा यांनी केले. कार्यक्रमाला महिला पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...