आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी दाखल:प्रवासी गाडीची स्कूटरला धडक; सहा जखमी

धडगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव ते बिलगाव रस्त्यावरील खर्डी येथे घाटात अति तीव्र उतार वळणावर सोमवारी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान गेंदागावहून धडगाव येथे जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सगाडी व स्कूटरचा अपघात झाला आहे.या अपघातात स्कूटरचालकासह पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातातील जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने धडगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मॅक्स गाडीचा तोलजात असल्याचे पाहून गाडीच्या टपावरती बसलेल्या प्रवासी खाली उड्या मारल्याने पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहॆ.

अपघात झालेल्या खासगी वाहनांमध्ये अधिक प्रवासी प्रवास करत टपावरती बसल्याचे प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितले. धडगाव बिलगाव या रस्त्याला फक्त एकच वेळ बस जात असल्याने गेंदा, माल भुषा व सावऱ्यादिगर भमाणा गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...