आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या आणि आधुनिक युगात घरगुती वापराची अनेक यांत्रिक उपकरणे उपलब्ध होत असली तरी गाव खेड्यांतूनच नव्हे तर शहरातही काही प्रमाणात पाटा-वरवंटा, खलबत्ता यासारख्या दगडी वस्तू वापरात असल्याने या अशा वस्तू लीलया घडवणाऱ्या पाथरवटांची कला अद्यापही जिवंत आहे.
तळोदा येथील यात्रेत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून म्हसावद येथून धोत्रे कुटुंब व्यवसाय करता आले असून तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात अजूनही मागणी आहे. वीज नसतानादेखील मसाला तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. दगडू धोत्रे, युवराज धोत्रे, लीलाबाई धोत्रे हे कुटुंब आले आहे. काही कुटुंबांनी आपला पिढ्यान्पिढ्या चालत आलेला व्यवसाय मोठ्या जिद्दीने पुढे चालू ठेवला आहे. अनेक ठिकाणी ठरावीक दिवसांत हे पाथरवट जाऊन आपला व्यवसाय करतात. आठ दिवसांपासून तळोदा यात्रेत जाते, खलबत्ते, दिवा (चाड), पाटा-वरवंटा आदी दगडी स्वतः घडवून विक्रीस मांडत असल्याचे दिसत आहे. धोत्रे हे वडिलोपार्जित चालत आलेले पाथरवटाचे काम करत आहेत.
पूर्वीप्रमाणे बाजारपेठ मिळवताना त्रास
धोत्रे म्हणतात, आपले फारसे शिक्षण झालेले नाही. घराण्यात ही कला आणि व्यवसाय वंशपरंपरेने चालत आलेला आहे. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात घरगुती जाते, पाटा, उखळ, दिवा, गोलवाला खलबत्ता, टोपीवाला खलबत्ता या नित्य वापराच्या वस्तूंऐवजी त्यांची जागा मिक्सर, ग्राईंडरने घेतल्याने त्याचा परिणाम आमच्या पारंपारिक व्यवसायावर झाला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे हुकमी बाजारपेठ मिळवताना त्रास होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.