आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान जिल्हाध्यक्षपदी पवार

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक या संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र प्रताप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील पानखेडा (पिंपळनेर) येथे आदिवासी एकता परिषदेची बैठक २६ जून रोजी झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल, एकता परिषदेचे डोंगर बागूल, राजू पांढरा, धुळे जिल्हाध्यक्ष मांगीलाल गांगुर्डे, संकल्प आदिवासी युवा संघटनेचे केतन खंबाईत, जयाताई सोनवणे उपस्थित होते.

राजेंद्र पवार हे डोंगऱ्यादेव माउली संघर्ष समिती, आदिवासी महासंघ, कोकणी-कोकणा समाज सेवा संघ, एकलव्य आदिवासी संग्राम परिषद अशा विविध आदिवासी संघटनांमध्ये समाजसेवेचे कार्य करीत आहेत. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात विविध मोर्चात सहभाग नोंदवला आहे.