आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पवारांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंडचा प्रयत्न

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात नंदुरबार शहर मंडलात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्याची गाढवावर बसवून तसेच जोडे मारून धिंड काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांकडून गाढव आणि पुतळाही जप्त केला.याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, युवराज राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण चव्हाण, कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाबाई पाटील, उद्योग सेल जिल्हाध्यक्ष सुदाम चौधरी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र गुरव, महिला मोर्चा प्रवेश सदस्य सविता जयस्वाल, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, शहर कोषाध्यक्ष कपिल वाघ, दिनेश नावरे, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष समीर मन्सुरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष काजल मछले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...