आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक वर्षात जीएसटीत वाढ करण्यात आली असून, इंधनाच्या दराचा फटका शैक्षणिक साहित्याला बसला आहे. यंदा प्रत्येक साहित्यावर १५ ते २० टक्के वाढ झाल्याने सामान्यांना आता अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. पेनच्या किमती तीन रुपयांनी तर दप्तर ५० रुपयांनी महागले आहे. रेनकोटसह सर्वच साहित्याच्या किमती वाढल्याने सामान्यांच्या खिशाला त्याचा फटका बसणार आहे. शैक्षणिक सत्राला १३ जून रोजी सुरुवात होऊन शाळा सुरू होणार आहेत. कोरोना काळात सर्व साहित्य स्वस्त होते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे साहित्य खरेदी न करताच मुले उत्तीर्ण झाली. आता मात्र शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेचे साहित्य घेण्यासाठी पालकांची वह्या, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. वॉटर बॅगची किमती आधी १०० रुपये होती ती आता १२० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे कपड्यांच्या किमती ४० रुपये प्रत्येक मीटरला वाढवण्यात आल्याने गणवेशदेखील महाग होणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत मिळणार आहे. वह्यांच्या किमतीदेखील वाढल्या असून कंपास पेटी १००, रेनकोट २२०, स्कूल बॅग २५० असे दर आहेत. रेनकोटची गुणवत्तेवर किंमत आहे. साधारण शंभर रुपयांमागे वीस रुपये अशी किंमत आहे. वह्यांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट चांगलेच बिघडणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.