आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:दिव्यांगांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा; दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत असून शासनामार्फत दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अद्यापही या योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या योजना अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी जनजागृतीची मोहीम राबवावी. केंद्र व राज्य पुरस्कृत दिव्यांग योजनांचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, मनुदेवी फाउन्डेशन, नंदुरबार संचलित दुधाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, माजी विभागीय समाज कल्याण अधिकारी जितेंद्र वळवी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्षा ज्योती चौधरी, समन्वयक राजेश चौधरी, ॲड. जयश्री वळवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...