आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मराठी भाषा दिन:पुस्तक प्रकाशनासह‎ कविसंमेल रंगले‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळक जिल्हा‎ वाचनालयात कुसुमाग्रज जयंती व‎ जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त‎ पुस्तक प्रकाशन व कविसंमेलन झाले.‎ अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष‎ अॅड. रमणलाल शहा होते. या वेळी‎ निंबाजीराव बागुल यांच्या ''हार प्रहार''‎ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.‎ व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून‎ मुख्याधिकारी अमोल बागुल, डॉ.‎ पीतांबर सरोदे, यशवंत पाटील, राजेंद्र‎ गावीत, रमाकांत पाटील उपस्थित होते.‎ प्रास्ताविक व परिचय निंबाजीराव‎ बागुल यांनी करून दिला. यावेळी‎ कविसंमेलनात अमोल बागुल, प्रा. डॉ.‎ उमेश शिंदे, प्रा. डॉ. सुनंदा पाटील, प्रा.‎ डॉ. सविता पटेल, विजय पाटील, नरेंद्र‎ पाटील, क.वि.राव, राम दाऊतखाने,‎ निरज देशपांडे, विजय पवार, जगन‎ चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, वैशाली‎ गोसावी यांनी कविता सादर केल्या.‎

बातम्या आणखी आहेत...