आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेवानगर येथील घटना:विद्यार्थ्यांनी बिया खाल्ल्याने विषबाधा

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यल्या सुटीत खेळण्यासाठी गेलेले ७ विद्यार्थ्यांना विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याची घटना रेवानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. तत्काळ त्यांना औषधोपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रेवानगर येथील तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीचे विद्यार्थी दुपारच्या सुमारास शालेय पोषण आहारातील भात खाल्यानंतर बाहेर पडले होते. त्यानंतर शिक्षक जेवणासाठी बसले असता पंधरा ते वीस विद्यार्थी शाळेच्या बाहेरील बाजूस खेळावयास गेले.

तेथे त्यांनी विषारी वनस्पतीचा बिया खाल्या. यानंतर दीड ते २ तासाने या पैकी ७ ते ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ते घरी गेले. रात्री ी प्रकृती अस्वस्थ झाल्याने ग्रामपंचायत सदस्य पिंट्या पावरा, राहुल पावरा, मनीषा पावरा, दगडू पावरा, संदीप पावरा, मन्या पावरा, नाथ्या पावरा, सरपंच हिरालाल पावरा यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी औषधोपचार करून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.

विषबाधा झालेले विद्यार्थी
निधी विष्णू पावरा (वय ९), पूनम छोटू पावरा (वय ७), आहान मेहरसिंग पावरा (वय ७), भाग्यश्री किसान पावरा (वय ८), अश्विनी जालमसिंग पावरा (वय ८), प्रीती राजेंद्र पावरा (वय ७), सेजल लक्षमन पावरा (वय ७) यासह गावातील काही बालकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...