आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून घरफोडीचा गुन्ह्याच्या तपास करून नंदुरबार येथील पोलिस कर्मचारी आपल्या मोबाइल स्काॅड व्हॅनने नंदुरबार येथे मुख्यालयाला जात असताना शहादा ते प्रकाशा रस्त्यावर मनरद ते लांबोळा गावा दरम्यान समोरून स्कुटीने येणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्न करीत असताना व्हॅन उलटली. त्यात स्कुटी चालक जागीच ठार झाला तर अन्य सहा पोलिस कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले.
नंदुरबार येथील मोबाइल स्काॅड व्हॅन (एमएच ३९, ए३३७) शहादा येथून गुन्ह्याच्या तपास करून नंदुरबार येथे परत जात असताना लांबोळा ते मनरद गावा दरम्यान शेतकरी आपल्या स्कूटीने (एम.एच.१८, ए.एफ. ५७००) जात असताना अचानक रस्त्यावर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला असता मोबाइल पोलीस व्हॅन पलटी झाली. त्यात या व्हॅनने तीन पलट्या मारल्या होत्या. त्यात स्कुटी चालक शंकर त्र्यंबक पाटील (वय ७५, रा. दोंडाईचा हल्ली मु. लांबोळा ता. शहादा) हा ठार झाला आहे. त्याच्या स्कूटीचा चक्काचूर झाला.
तर मोबाइल पोलीस व्हॅनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातस्थळी लांबोळा व मनरद ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केले आहेत. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये प्रकाश भाबड सादीक पिंजारी दिनेश लाडकर, संजय रामोळे, गोकुळ गावित, दिलीप गावित (सर्व रा. नंदुरबार) यांच्या समावेश आहे. त्यात सादीक पिंजारी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.