आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:पोलिस क्रीडा स्पर्धेचा आज समारोप

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारी दिवसभरात पुरुष आणि महिला गटातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारांच्या सामन्यांमध्ये माेठी चुरस निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी शुक्रवारी पोलिस कवायत मैदानावर ३३ व्या नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेच्या हाेणाऱ्या समारोप समारंभप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले आहे.

दरम्यान गुरुवारी कुस्ती, ज्युदाे, बास्केटबाॅल, फुटबाॅल व व्हाॅलिबाॅल या क्रीडा प्रकारांचे उपांत्य फेरीचे सामने झाले. अंतिम संघातील लढती निश्चित झाल्या असून शुक्रवारी अंतिम सामन्यांमध्ये काेण बाजी मारताे, याकडे लक्ष आहे.

आज अंतिम सामने; महानिरीक्षक उपस्थित राहणार
खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील पात्र असलेल्या संघांत शुक्रवारी अंतिम सामने खेळवले जाणार असून, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील, नाशिक शहरचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हे समाराेप साेहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...