आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील:अश्लील व्हिडिऑेप्रकरणी  पोलिस कर्मचारी निलंबित ; तिघांना सात दिवस कोठडीत ठेवण्याचे ऑदेश

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अश्लील व्हिडीओ कॉल करणारी महिला, तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी, वय ५०) व पोलिस हवालदार छोटूलाल तुमडू शिरसाठ (वय ४६) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान पोलिस हवालदार शिरसाठ यास तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार शहरातील ४१ वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांना देखील सदर महिला, तिच्या आणखी दोन महिला साथीदार व तथाकथित पत्रकार यांनी दोन महिन्यांपूर्वी छेडखानी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देवून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे तक्रारदार हे नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे आले असता त्यांच्या तक्रारीवरुन सदर महिला, तिच्या आणखी दोन महिला साथीदार व तथाकथित पत्रकार यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ कॉल करुन व बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील, त्या नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता समोर येवून पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार ऑहे, असे आवाहन करण्यात ऑले ऑहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिस हवालदार शिरसाठ याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...