आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेसाठी गर्दी:शहादा येथे वटपौर्णिमेनिमित्ताने पूजा

शहादा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिर आवारात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांनी पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळपासूनच सप्तशृंगी माता मंदिराच्या आवारात वडाच्या झाडाच्या खाली महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती. शेकडो महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. फेऱ्या मारून पांढरा धागा बांधला. प्रत्येक महिलेने आपापले पूजेचे ताट व साहित्य सोबत आणले होते. पूजा विधी करणारे पुरोहितही उशिरापर्यंत थांबून होते. याव्यतिरिक्त शहरातील स्वामी समर्थ केंद्र आणि प्रकाशा रस्त्यावरील साईबाबा मंदिराच्या ठिकाणीदेखील महिलांनी पूजेसाठी गर्दी केली.

होती. खेतिया रस्त्याजवळ अंबाजी माता मंदिराच्या आवारातदेखील मोठे वडाचे झाड असल्याने त्या ठिकाणी पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती. पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी तसेच संसार सुखी होण्यासाठी वटसावित्रीला उपवास केला जातो. वडाच्या झाडाला कच्चा धागा फेऱ्या मारून बांधला जातो, ही धार्मिकदृष्ट्या परंपरा आहे. पतीवर कितीही संकट आले तरी ते सुखरूप राहावे हा दृष्टिकोन वटसावित्री पौर्णिमेचा आहे, अशी प्रतिक्रिया पूजाविधी करणाऱ्या महिला भाविक संगीता राजेंद्र महाले यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...