आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नटावद आदिवासी सोसायटी चेअरमनपदी प्रकाश गावित; व्हा. चेअरमनपदी रणजित नाईक यांची निवड

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नटावद आदिवासी वि.का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या वेळी चेअरमनपदी प्रकाश कृष्णराव गावित तर व्हाइस चेअरमनपदी रणजित लच्छीराम नाईक तसेच संचालक मंडळाची निवड करण्यात आली.

नटावद ग्रामपंचायत कार्यालय येथे अध्यासी अधिकारी कु.आर.आर.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नटावद आदिवासी वि.का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली किसान परिवर्तन पॅनलच्या सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. त्यात चेअरमनपदी प्रकाश कृष्णराव गावित, व्हाइस चेअरमनपदी रणजित लच्छीराम नाईक तसेच संचालकपदी कुंदन मारुतीराव गावित, गणेश प्रताप वसावे, फुलसिंग रामसिंग वळवी, जोरसिंग रणछोड नाईक, प्रशांत सुरेश गावित, शरद कृष्णाजी वसावे , आतिष महेंद्र पाडवी, श्रीमती केसराबाई भाईदास वळवी, श्रीमती सुरैया शंकर वळवी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे सचिव नरेश नाना शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...