आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:जिल्ह्यात इको टुरिझम स्थळांसाठी आराखडा तयार करा; पालकमंत्री

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात इको टुरिझम स्थळे विकसित करण्यासाठी वन विभागाने आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी गुरुवारी येथे दिल्या. उपवनसंरक्षक, नंदुरबार वन विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हीना गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, धुळे वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) दिगंबर पगार, उपवन संरक्षक कृष्णा भवर, नितीनकुमार सिंग, लक्ष्मण पाटील, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, संजय साळुंके, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, जिल्ह्यात जास्तीत जास्त झाडांची लागवड करावी. यासाठी जिल्हा परिषद शाळा परिसर, जिल्हा आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारत परिसरात झाडे लावण्याच्या सूचना देण्यात येतील.

ट्रायबल टुरिझम; प्रस्ताव द्या
खासदार डॉ. गावित म्हणाल्या की, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होत आहे. ते वाचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. वन विभागाने इको टुरिझम व ट्रायबल टुरिझम सेंटर विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...