आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:प्रतिबंधात्मक उपाययोजना ; मान्सून काळात धरणांवर वायरलेस यंत्रणा बसवावी

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लघू व मध्यम प्रकल्पांची संयुक्त पाहणी करून धरणांवरील वायरलेस यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळवल्यानुसार, कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या लघू व मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती मान्सून सुरू होण्यापूर्वी करावी.

यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांनी लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करून धरण, प्रकल्प सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नद्यांच्या पाणी पातळीनुसार सोडण्याचे नियोजन करावे. विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्वकल्पना प्रशासनास द्यावी, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...