आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूरमुक्त चुलीचे स्वप्न हवेत:दरवाढीचा भडका; 35 हजारांपैकी 7 हजार ग्राहकच ‘उज्ज्वल’च्या गॅसचा करताय वापर

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 रुपयांत कनेक्शन, भरण्यासाठी लागतात 1 हजार रुपये

शासनाने गॅसवरील सबसिडी बंद केली. त्यानंतर घरगुती वापराचे गॅसचे दर वाढतच जावून थेट १ हजार रूपयांपेक्षा अधिक किमतीवर गॅसचे दर स्थिरावले आहेत. या वाढत्या किमतीमुळे उज्ज्वला गॅस ग्राहकांना आता गॅस घेणे परवडत नसल्याने ३५ हजार ग्राहकांपैकी केवळ ७ हजाराच्या आतच ग्राहक गॅसचा वापर करीत आहेत. त्यामुळे आदिवासी महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत.

नंदुरबार जिल्हा हा ६७ टक्के आदिवासी जिल्हा आहे. ग्रामीण, आदिवासी महिलांची धुरातून मुक्तता व्हावी,तसेच प्रदुषण रोखले जावे,यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. यापूर्वी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही आदिवासी भागात गॅस शेगडया वाटपाचा सपाटाच लावला होता. परंतु मोफत दिलेले गॅस आता आदिवासी महिलांना न परवडणारा ठरत असून गॅस वापर जवळपास बंद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...