आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाल्यांचे दर उतरले:आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आवक जास्तमुळे भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सध्या भेंडी, वॉलपापडी, कोथिंबीर, हिरवी मिरची, गिलके आणि दोडके या सर्वच भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हिवाळा सुरू होताच भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कांदे वगळता सर्वच भाजीपाल्यांचे दर उतरले आहेत.

होलसेलमध्ये भेंडी १० रुपये किलो, मिरची १५ ते २० रुपये किलो, टाेमॅटो ७ रुपये किलो, वालपापडी ३० रुपये किलो, मेथी १५ ते २० रुपये किलो, कोथिंबीर १० रुपये, वांगी १० रुपये, गड्डा कोबी १०, फ्लॉवर १० असे दर असून यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजीपाला एजंट विजय माळी म्हणाले, हिवाळ्यात भाजीपाल्याची आवक जास्त असते. त्यामुळे सर्वच दर खाली येतात. हा दर असाच जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहू शकताे.

बातम्या आणखी आहेत...