आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:अक्कलकुवा, खापर येथे युवासेनेची प्राथमिक ऑनलाइन सदस्य नोंदणी

अक्कलकुवा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढवावी, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी खापर व अक्कलकुवा येथे झालेल्या शिवसेना व युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

खापर व अक्कलकुवा येथे घेण्यात शिवसेना ऑनलाइन प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी केले. या वेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवींद्र गुरव, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शिवसेना शहरप्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, अल्पसंख्याक शहरप्रमुख शाकिफ पठाण, शिवसेना शहर उपप्रमुख जितेंद्र लोहार, संतोष पवार, जगदीश चित्रकथी, योगेश सोनार, जसराज पवार, कुलदीप टाक, पार्थ लोहार, जमील शेख, जसराज पवार, योगेश तेली, किरण भावसार, रवी पाडवी, सोनू येशी, केतन वाडिले, मनोज चौधरी, किशोर चौधरी, जोलू वळवी, अनिल परदेशी, सुनील पाडवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...