आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:उपधान तप साधना करणाऱ्या 50  तपस्वींची मिरवणूक

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात उपधान तप साधना करणाऱ्या ५० तपस्वींची मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह जैन बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. बुधवारी मालाराेपन विधान समारोह आयोजित करण्यात आला आहे.शहरातील ५० तपस्वींनी पन्नास दिवस जमिनीवर झोपून उपवास केले. ४८ तासांत केवळ ४८ मिनिटे साध्या पद्धतीने भोजन, ५० दिवस स्नान करायची नाही, असे हे कठीण व्रत मानले जाते. तसेच हिरव्या पालेभाज्यांचा त्याग, काजू, बदाम, किसमिस असे ड्रायफ्रूट न खाता साध्या पद्धतीने तपस्वींनी पन्नास दिवस तपश्चर्या केली.

पहाटे उठून धार्मिक विधींचे पालन केले. यात महिला, लहान मुलांचाही समावेश होता. बुधवारी या सर्वांचा पुष्पमाला देऊन सत्कार करण्यात येणार आहे. दिवसभर धार्मिक कार्यक्रमाने जैन बांधवांमध्ये उत्साह आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती पारस कवाड, मदनलाल जैन यांनी दिली.\

बातम्या आणखी आहेत...