आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार शहरात 27 पेक्षा अधिक भागात होळी‎:बालाजीवाडा मानाच्या‎ होळीचे विधिवत पूजन‎

नंदुरबार‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बालाजी वाडयाच्या‎ मानाच्या होळीचे विधिवत पुजा‎ करण्यात आली. त्यानंतर शहरातील‎ २७ पेक्षा अधिक भागातील होळी‎ पेटवण्यात आली. सायंकाळी प्रत्येक‎ होळीचे परिसरातील भाविकांनी‎ दर्शन केले. दुपारी पडलेला पाऊस‎ त्यानंतर रात्री गारव्याचे वातावरण‎ अशा परिस्थितीत होळीचा सण‎ साजरा करण्यात आला. यावेळी‎ प्रत्येक भागात डफ वाजवण्यात‎ आले. नंदुरबार शहरातील‎ मध्यवर्ती गणपती मंदिर, गवळीवाडा‎ देसाई पुरा, परदेशी पुरासह विविध‎ कॉलनी, चौधरी गल्ली भागात‎ होळीचा सण मोठया उत्साहात‎ साजरा करण्यात आला. शहरासह‎ जिल्हयातील मानाच्या काठीच्या‎ होळीसाठी अनेक अधिकारी, नेते‎ पोहचले. ही होळी पहाटे पेटत‎ असल्याने मंगळवारी सर्व अधिकारी‎ नंदुरबारला पोहचतील. शहरातील‎ बालवीर चौकात सोमवारी‎ संध्याकाळी शहीद शिरीषकुमार‎ मित्र मंडळातर्फे वृक्षपुजनासह‎ होलिकोत्सव साजरा केला.‎

बातम्या आणखी आहेत...