आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध योजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधताना बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता नीलिमा मंडपे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासह रनाळा, मांडळ, खोंडामळी मंडळातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठी संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई निवारण्याच्या कामासह विहीर अधिग्रहण, हातपंप, विहीर खोलीकरण, नदी, नाले, तलावांचे गाळ काढणे, नवीन हातपंप बसवणे, हातपंप दुरुस्ती तसेच रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या पाणंद रस्ते, घरकुल तसेच विविध योजनांची कामांच्या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने त्वरित सादर करावा. अशा प्राप्त प्रस्तावाला यंत्रणेने त्वरित मंजुरी द्यावी. ज्या गावांना पाणीटंचाई जाणवणार आहे अशा गावांनी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
पाणी योजनांच्या दुरुस्त्या करा
पाणीपुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्या जलस्राेतांचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा. पर्यावरणांचा समतोल साधण्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, गाव तसेच गावाच्या पडीक जमिनीवर वृक्षारोपण करावे, अशा सूचना मंत्री गावितांनी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.