आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळातर्फे खासगी ठेकेदाराकडून इलेक्ट्रिकल बस घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या जागेवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील. त्यासाठी ही जागा खासगी एजन्सीला करार तत्त्वावर देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. तसेच काही जागा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांची माहिती मागवण्यात आली आहे. कोरोन काळात दोन वर्षे एसटी सेवा बंद होती. त्यानंतर राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सहा महिने कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे एसटीच्या तोटा वाढला. तो भरून एसटी महामंडळातर्फे उत्पन्नाचे स्रोत शोधले जात आहे.
तसेच आता महामंडळातर्फे राज्यभरासाठी ५ हजार १५० इलेक्ट्रिकल बस घेण्यात येतील. त्यापैकी दोन हजार बस खासगी तत्त्वाने घेण्यात येतील. धुळे विभागाला १०० बस मिळणार आहे. इलेक्ट्रिकल बसच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील. ते उभारण्यासाठी एसटीची जागा करार तत्त्वावर खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी विभाग नियंत्रकांकडून माहिती मागवण्यात आहे. राज्यभरात जवळपास ७० ठिकाणी चार्जिंग सेंटर सुरू करावी लागणार आहे. हे सेंटर खासगी कंपनी चालवणार आहे. त्यासाठी खासगी कंपनीला आगार किंवा बसस्थानकातील जागा देण्यासाठी माहिती मागवण्यात आली आहे. याशिवाय एसटीच्या जागेवर पोलिस वसाहत बांधण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहे. त्यासाठी १ डिसेंबरला एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठवत रिक्त असलेल्या जागेची माहिती पाठवावी, अशी सूचना केली आहे.
मागवलेली माहिती अशी बसस्थनाकातील मोकळ्या जागांच्या आकार, बस थांबण्याच्या जागा अथवा चार्जिंग सेंटरसाठी जागा, उच्चदाब वाहिनी टाकण्यासाठी येणारा खर्च, महावितरणच्या अभियंत्यांचे पत्र, बसस्थानकाजवळ असलेल्या उच्चदाब वीज वाहिनीची क्षमता किंवा महावितरणचे केंद्र, एसटीची जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत आहे, जागा बसस्थानक, डेपोसाठी राखीव आहे का ही माहिती मागवली आहे.
महामंडळाचा निर्णय चुकीचा एसटी महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. या जागांवर विकासकांचा डोळा आहे. एसटीच्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभारण्याची आवश्यकता आहे. पण त्याकडे कानाडोळा करून आता ही जागा चार्जिंग स्टेशनसाठी खासगी ठेकेदाराला कराराने किंवा पोलिस वसाहतीसाठी देणे चुकीचे आहे. चंद्रकांत गोसावी, विभागीय सचिव, इंटक
कर्मचाऱ्यांची वसाहत भुईसपाट : शहरात बसस्थानकाच्या मागील बाजूला कर्मचाऱ्यांची वसाहत होती. या वसाहतीतील घर जीर्ण झाल्याने आता सर्व घर पाडण्यात आली आहे. या जागेवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभारण्याची मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.