आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:पुतळा, ध्वज जाळून पाकिस्तानचा निषेध

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी यांनी यूएनएससीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविराेधात अतिशय खालच्या स्तरावर जावून केलेल्या टीकेचा शहरातील नगरपालिका चौकात निषेध करण्यात आला. भाजप प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात बिलावल यांचा प्रतीकात्मक पुतळा व पाकिस्तानचा ध्वज यांचे दहन करून तीव्र निषेध नाेंदवण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, युवराज राजपूत, डॉ.सपना अग्रवाल व संगीता सोनवणे, कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा, नगरसेवक प्रशांत चौधरी, नीलेश पाडवी व आनंद माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, शहराध्यक्ष काजल मछले, महिला शहर उपाध्यक्ष रेखा चौधरी व सुरैया खाटीक, शहर कोषाध्यक्ष कपिल वाघ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश चौधरी, तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, आदिवासी मोर्चाचे शहराध्यक्ष विजय नाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...