आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भडका नंदुरबार, नवापूर येथे आंदोलन करून नोंदवला निषेध; केंद्राविरुद्ध घोषणाबाजी

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महागाई विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

नंदुरबारला केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन
पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या विक्रमी दरवाढीने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या निषेधार्थ शहरातील सुभाष चौकात निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशान्वये, प्रदेश उपाध्यक्ष व नंदुरबार प्रभारी सत्यजित सिसोदे यांच्या सहमतीने तसेच जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड राऊ दिलीपराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, युवक शहरध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, शहर उपाध्यक्ष लल्ला बागवान, युवक संघटक जितेंद्र ठाकरे, शहर कार्याध्यक्ष कालू शाह, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबाड़े, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी उपस्थित होते.

एप्रिल फूल करीत पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा
नवापूर | शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे १ एप्रिल २०२२ रोजी शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपा संमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाचा जन्म दिवस एप्रिल फुल म्हणून महागाई, बेरोजगारी,खोटे जुमले या आश्वासनाच्या केक कापून वाढदिवस साजरा केला. जिल्हाउपाध्यक्ष अमृत लोहार, न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, शहराध्यक्ष शरद पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इंद्रीस पठाण, शहर उपाध्यक्ष राकेश गावीत, हेमंत नगराळे, गोलू पाटील, सनी सावरे, अर्जुन सावरे, मयुर सावरे, अजय जाधव, शारूख खाटीक, सलमान बागवान, अली खाटीक, समीर शेखसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदधिकारी उपस्थित होते. जिल्हाउपाध्यक्ष लोहार म्हणाले, केंद्र सरकारने जनतेला एप्रिल फुल बनवले आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्र भर १ रोजी एप्रिल फुलचा कार्यक्रम म्हणून इंधनचे भाव वाढले आहे याचा निषेध व्यक्त केला.

नंदुरबार | पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात शुक्रवारी नंदुरबारसह नवापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केंद्र शासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. तसेच रोजच्या वाढत्या इंधन दरवाढीला लगाम लावण्याची मागणी आंदोलकांनी केली

बातम्या आणखी आहेत...