आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर सभा:मंत्री गुलाबराव पाटील यांची आज शनिमांडळला जाहीर सभा

नंदुरबार7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नंदुरबार तालुक्यातील शनि मांडळ येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जाहीर सभेत ते भाषण करतील. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

त्यानंतर दुपारी ३ वाजता शनि मांडळ येथील शनी चौकात बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाहीर सभा हाेणार असून मंत्री पाटील मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...