आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नवापूर येथील आठवडे बाजारालगतचे सार्वजनिक शौचालय अडकले वादात; प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेऊन विरोध न करण्याचे केले आवाहन

नवापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बेलदार वाड्यातील आठवडे बाजारालगत नवीन सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला काही लोकांचा विरोध होत आहे. तर काही नागरिकांनी शौचालय तयार करावे अशी मागणी केली आहे. दोन्ही गटाकडून पालिकेला निवेदन देण्यात आले. त्यानंतर आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणकर्त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपने त्यांना पाठिंबा दिला. सोमवारी तहसील कार्यालयात भाजपने ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शौचालयाची पाहणी करत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. लोकहिताच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करू नका बांधकाम करू द्या, असे बैठकीत सांगितले.

नवापूर शहरातील बेलदारवाडा भागात नगर पालिकेने नवीन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम स्थगित न केल्याने दिव्यांग महिला प्रमिला गावित आणि पूनम बिऱ्हाडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मंगळवारी सहावा दिवस उजाडला तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. उपोषणाचा काहीही उपयोग होत नसल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून उचित कारवाई न झाल्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी बेलदार वाड्यातील उपोषणास बसलेल्या दिव्यांग महिला प्रमिला गावित आणि पूनम बिऱ्हाडे यांना प्रशासन न्याय देत नाही म्हणून दोन तास ठिय्या आंदोलन तहसीलदार यांच्या दालनात सुरू केले. तर मंगळवारी प्रांताधिकारी मीनल करणवाल यांनी पाहणी करून बैठक घेतली.

बातम्या आणखी आहेत...