आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोंबिवली येथे झालेल्या दुसऱ्या पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात नंदुरबारचे कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे लिखित निसिंधू काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक शरद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
निसिंधू या काव्यसंग्रहाचे लेखक व कवी संदीप पाटोळे कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून, प्रामुख्याने शेती व शेतकरी यांच्याशी निगडित शेती मातीच्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ९२ कविता समाविष्ट आहेत. काव्यसंग्रहाची प्रस्तावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहिली आहे. तसेच काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांचे असून, परीस पब्लिकेशन पुणे या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आहेत. अखिल भारतीय साहित्य परिषद- मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक, इतिहास संशोधक, संगीतकार, सिने दिग्दर्शक, शिव व्याख्याते, अ.भा.म.सा.प.चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका, नाट्य दिग्दर्शिका, सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ,हिरकणी राजश्री बोहरा तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक अनिता गुजर होत्या. डोंबिवलीचे टी.डी.सी. बँकेचे चेअरमन, स्थानिक नगरसेवक, उद्योगपती, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बाबाजी पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.