आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाला गती:नंदुरबार रेल्वेस्थानकावर रॅक पॉइंटमुळे व्यवसाय वृद्धीसह 150 जणांना रोजगार; स्थानिक 120, परप्रांतीय 30 मजुरांच्या हातास काम

नंदुरबार10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्याच दिवशी लोकवन गहू आंध्र प्रदेशात रवाना

नंदुरबार रेल्वे स्थानकावर रॅक पॉइंट सुरू करण्यात आला असून पहिल्याच दिवशी मालगाडीने सिमेंटच्या गोण्या नंदुरबारच्या रॅक पॉइंटला पोहचल्या तर नंदुरबारचा लोकवन गहू आंध्र प्रदेशला पाठवण्यात आला आहे. तर रॅकपॉइंटमुळे स्थानिक १२० आणि परप्रांतीय ३० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शनिवारी रॅक पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आरसीएफचे मार्केटिंग ऑफीसर संदीप शिरसाठ, भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील, रेल्वे सल्लागार समिती सदस्य जवाहरलाल जैन, मोहन खानवानी, गोपी उत्तमानी, नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, एकनाथ पाटील, भरत माळी, दुर्गेश राठोड, सुभाष पानपाटील आदींसह शहरातील व्यापारी उपस्थित होते. आरसीएफचे अधिकारी संदीप शिरसाठ यांनी आभार मानले. या रॅकमुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबारच्या गव्हाला मिळणार चांगले मार्केट
पहिल्याच दिवशी नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील लोकवन गहू पोहोचवला. नंदुरबारच्या लोकवन गव्हापासून पीठ तयार केले जाते. ते देशातील सर्वच शहरात पोहचवले जाते. प्रसिद्ध आशीर्वाद आटा या कंपनीत पीठ तयार होते. यासाठी नंदुरबारच्या लोकवन गव्हाला पसंती दिली जाते. यामुळे अधिक मार्केट मिळणार आहे.

व्यापाऱ्यांचा वाचणार वेळ
यापूर्वी दोंडाईचा येथे रॅक पॉइंट उभारला होता. नंदुरबार जिल्हा होऊन देखील दोंडाइचा येथेच खत उतरवले जायचे. त्यामुळे नंदुरबारच्या शेतकऱ्यांना उशिराने खत प्राप्त होत होते. नंदुरबारला रॅक पॉइंटला मंजुरी मिळाल्याने व्यापाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ खत उपलब्ध हेाणार आहे. विविध कंपन्या आता नंदुरबारला एजन्सी देऊ शकतील. तर रॅकपॉईंटवर आता रेशनचा माल येऊ शकणार असल्याने अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर या गावांना माल वितरित क रणे सोपे होणार आहे.

अशी आहे मालाची क्षमता
४५ रुपये टन याप्रमाणे मजुरांना मोबदला मिळणार आहे. पूर्ण डब्यातील माल खालीसाठी ४तास लागतात. ५८ डबे ३ हजार टन, २९ डबे १५०० टन, ४२ डबे २६०० टन, २१ डबे १३०० टन माल भरतात.

रॅक चालवण्यासाठी काढणार टेंडर
हे रॅक प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. हे रॅक एजंसीला चालवायला देणार आहोत. यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. खासदार डॉ. हीना गावित यांचे सहकार्य लाभले.
संदीप शिरसाठ, मार्केटिंग ऑफिसर

बातम्या आणखी आहेत...