आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तरी शुद्ध येईल:मालेगाव मनपातील कनिष्ठ अभियंत्याचा शासकीय विश्रामगृहात दारु पिऊन राडा, नवापूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील शासकीय विश्रामगृहात मालेगाव महानगर पालिका येथील एका कर्मचार्‍याने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहे. व्हायरल ओळखपत्रात मालेगाव महानगर पालिका मयुर शंकर महाजन,पद कनिष्ठ अभियंता असे लिहिले आहे.

नवापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद नाईक हे परिवारासह देवमोगरा येथे देवदर्शनासाठी गेले होते, परत येताना अक्कलकुआ शासकीय विश्रामगृहात आरक्षित केलेल्या रूममध्ये जात असताना त्यात मद्यधुंद अवस्थेत कर्मचारी आढळून आले. त्यांनी त्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी दारूच्या नशेत अरेरावी करत हुज्जत घातली.

बेधुंद अवस्थेत ते कक्षात आढळून आले तसेच कक्षात दारूच्या बॉटल्स देखील आढळून आल्या. यासंदर्भात विनोद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, महानगरपालिका मालेगाव, अक्कलकुवा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार केली.

प्रतिष्ठित व्यक्तींना असा त्रास होत असेल तर याकडे अक्कलकुआ शासकीय विश्रामगृह प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मालेगाव महानगरपालिकेत संपर्क केला असता सदर कर्मचारी जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाणीपुरवठा विभागात मानधन तत्वावर कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

इनपुट - निलेश पाटील, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...