आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यप:शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्य कार्यवाहपदी रघुवंशी; राज्य कार्यकारिणी सदस्यपदी राजेंद्रकुमार गावित

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर नंदुरबार जिल्ह्याला तीन प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यात राज्य कार्यवाहपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्यपदी राजेंद्रकुमार गावित तर विभागीय कार्यवाहपदी प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे यांची निवड करण्यात आली आहे. १९ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री खंडेराय प्रतिष्ठान एस. के. पी. कॅम्प बालेवाडी (पुणे) येथे झाली. या वेळी २०२२ ते २७ या कार्यकाळासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची तसेच कार्याध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांची निवड झाली.

या कार्यकारिणीत नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची राज्य कार्यवाह म्हणून तर आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने राज्य कार्यकारिणी म्हणून विभागीय पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यानुसार नाशिक विभागाचे अध्यक्ष म्हणून अनिकेत विजय पाटील यांची तर महाराष्ट्र राज्य टीडीएफचे सहकार्यवाह प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे यांची विभागीय कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तीन प्रतिनिधींना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व संघटनांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बैठकीत भास्करराव पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.